अनिल म्हस्केंवर व्हाईस ऑफ मीडियाची मोठी जबाबदारी! केंद्रीय कोअर कमिटीत समावेश! दिल्लीच्या राष्ट्रीय अधिवेशनात संघटनेचा निर्णय....

 
 दिल्ली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्यावर संघटनेने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. अनिल म्हस्के यांचा संघटनेच्या १० सदस्यीय केंद्रीय कोर कमिटीत समावेश करण्यात आला आहे. दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला..केंद्रीय मंत्री तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री जितेंद्र मांझी यांच्याहस्ते अनिल म्हस्के यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..
 
 अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात व्हॉइस ऑफ मीडियाचे दमदार काम उभे राहिले आहे. पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अनिल म्हस्के यांच्या कल्पक नेतृत्वात अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. अनिल म्हस्के यांच्या या कामाची दखल घेत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वातील कोअर कमिटीत अनिल म्हस्के यांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, दैनिक देशोन्नती चे संपादक तथा संघटनेचे मार्गदर्शक प्रकाश पोहरे, प्रख्यात पत्रकार अशोक वानखेडे, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते अनिल म्हस्के यांचा सन्मान करण्यात आला. देशभरातून आलेले विविध राज्यांचे व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष तथा जनरल सेक्रेटरी या अधिवेशनात उपस्थित होते.