अनिल म्हस्के आणि टी. डी. अंभोरेंनी घेतली छत्रपती खा. उदयनराजेंची भेट! बुलडाण्यातील शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे दिले निमंत्रण.....

 
Jhcg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा १९ सप्टेंबरला मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनाही देण्यात आले. आज,१५ सप्टेंबरला शिवस्मारक समितीचे सचिव तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, अध्यक्ष टी.डी.अंभोरे यांच्यासह शिष्टमंडळाने छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांची सातारा येथे भेट घेतली. यावेळी लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण त्यांना देण्यात आले. 
बुलढाणा येथील ऐतिहासिक शिवस्मारकाचे लोकार्पण १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी शिवस्मारक समितीच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान या सोहळ्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही शिवस्मारक समितीने निमंत्रण दिले आहे. यावेळी शिवस्मारक समितीचे सचिव तथा व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष टी. डी. अंभोरे, मंगेश बिडवे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष सिद्धार्थ आराख, राजेश वाईंदेशकर, रमेश भोपळे, रवि बाहेकर यांची उपस्थिती होती.