उदयनगरात जुना वाद उफाळला; तब्बल ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल... एकाचं प्रश्नाची चर्चा..नेमकं घरात कोण घुसलं?

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील उदयनगरात दोन गटात राडा झाला आहे. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली..दोन्ही गटांनी अमडापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या..दोन्ही कडील एकूण ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. दोन्ही गट एकाच समाजाचे आहेत..एका गटातील १८ तर दुसऱ्या गटांतील २२ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे दोन्ही तक्रारीत "घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप" करण्यात आला आहे..त्यामुळे नेमकं खरंच घरात कोण घुसलं? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार असून उदयनगरात त्याच प्रश्नाची चर्चा आहे...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना चिखली तालुक्यातील उदयनगरची आहे. सायंकाळच्या सुमारास जुन्या वादातून एका समाजातील दोन गटांचा वाद उफाळून आला. दोन गटांत लाठ्या काठ्या, लोखंडी रॉडने मारहाण झाली. एका तक्रारीत घरावर दगडफेक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. उदयनगर येथील सय्यद जफेरून शेख मुख्तार (४१) यांच्या तक्रारीवरून सय्यद अजहर सय्यद अबदार ,,सय्यद साबीर सय्यद अबदार,सय्यद रिहान सय्यद अजहर ,शेख मकसूद शेख मंजूर ,शेख सादिक शेख मकसूद ,सय्यद ताज सय्यद सरदार ,सय्यद सिद्धिक सय्यद ताज ,सय्यद इमरान सय्यद ताज ,सय्यद मजहर सय्यद ताज 
,शेख लुकमान शेख शेख रहेमान ,शेख मेहताब शे लुकमान ,शेख अल्ताफ शेख लुकमान ,शेख सुलतान शेख रहेमान ,शेख हबीब शेख कादर ,शेख यसूफ शेख ख्वाजा 
,शेख अयुब शेख यसूफ ,शेख रफिक शेख हनिफ ,शेख आगा शेख बिस्मिला ,शेख शाहिद शेख महेबूब ,शेख दानिश शेख आगा ,शेख नसिर शेख ख्वाजा, सय्यद जुबेर सय्यद ताज अशा २२ जणांविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला.
     तर दुसऱ्या गटाकडून सय्यद अजहर सय्यद अबदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख रशीद शेख अशरफ ,शेख नसिर शेख रशीद ,शेख बशीर शेख रशीद ,शेख शारुख शेख शब्बीर ,उमर पठाण राजू पठाण ,शेख फारुख शेख शब्बीर ,शेख आरिफ शेख शब्बीर ,शेख शरीफ शेख शबीर ,शेख अशफाक शेख रशीद ,राजू पठाण ,चांद पठाण राजू पठाण ,शेख शरीफ उर्फ बब्बू शेख हबीब ,शेख बिस्मिला शेख रशीद ,शेख कलीम शेख इसाक ,अफसर खा अजीज खा ,शेख सोहिल शेख शरीफ,शेख साहिलं शेख शरीफ,शेख मुक्तार शेख दावलं अशा १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....