

महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचे महत्वाचे पाऊल! एकाच क्लिकवर "जिथे असाल तिथे" मिळणार मदत! महिला आपत्कालीन मदत व मार्गदर्शन लिंकचे एसपी विश्व पानसरेंच्या हस्ते लोकार्पण...
Updated: Apr 14, 2025, 20:43 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी बुलडाणा पोलिसांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. आता एकाच क्लिकवर महिलांना तातडीची मदत मिळणार आहे. महिला आपत्कालीन मदत व
मार्गदर्शन लिंकचे एसपी विश्व पानसरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. जिल्हा पोलिस दलाकडून एका लिंक महिला व जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना या लिंकवर क्लिक करून तक्रार केल्यास पोलिस नियंत्रण कक्ष व नजिकच्या पोलिस स्टेशन मध्ये एक सायरन वाजेल, त्यानंतर संबंधित यंत्रणा तक्रारदार महिलेच्या मदतीच्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलेल..आवश्यकता भासल्यास पोलिसांचे एक पथक महिलांच्या मदतीसाठी घटनास्थळावर पोहोचणार आहे. सदर लिंक जिल्ह्यातील महिलांनी आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून त्यावर नोंदणी करावी असे आवाहन एसपी पानसरे यांनी केले.लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा...