भावनिक सोहळा! सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा व कुटुंबीयांचा एसपी निलेश तांबेनी केला सन्मान..!
Jun 3, 2025, 13:38 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पाच पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक ३१ मे २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालयात निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात एसपी निलेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुन यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, मोमेंटो, झाडाचे रोपटे, भेटवस्तू (साडी), सेवानिवृत्त प्रमाणपत्र देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे पुढीलप्रमाणे
श्री.दिलीप निळकंठ राजे जाधव श्रेणी पोउपनि पो.स्टे. शेगाव शहर, श्री.श्याम खेमचंद पवार श्रेणी पोउपनि पो.स्टे. जलंब,श्री, यशवंत किसन तायडे सहा. पोउपनि ब.नं. ७०७, पो.स्टे. बोराखेडी, श्री.प्रदीप बाबुराव गडाख सहा. पोउपनि ब.नं. ७३०,श्री. सुभाष साळोख पोहेकों ब.नं. १३७८, पो.स्टे. मलकापूर शहर...
या समारंभास प्रभारी पोउपअधीक्षक (मुख्यालय) श्री बाळकृष्ण पावरा, पोउपनि विजय हुडेकर, मपोकों रेखा बकाल, पोहेका सतिष सोनुने (कल्याण शाखा) यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-अंमलदार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.