अमरावती विद्यापीठाचा ४९ महाविद्यालयांना दणका! २०२५–२६ च्या प्रथम वर्ष प्रवेशाला बंदी! चिखलीच्या कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे फार्मसी कॉलेजचा ही समावेश;
बुलडाणा जिल्ह्यातील "या"१८ महाविद्यालयांमध्ये प्रवेश होणारच नाही!कारण काय....
May 8, 2025, 18:02 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ४९ महाविद्यालयांना दणका दिला आहे. विना शिक्षक विना प्राचार्य ही महाविद्यालये चालवल्या जात असल्याचे विद्यापीठाचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे २०२५ – २६ पासून या महाविद्यालयांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. या ४९ महाविद्यालयांच्या यादीत बुलडाणा जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे फार्मसी कॉलेचे देखील प्रथम वर्षाचे प्रवेश यंदा होणार नाहीत.. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कूल सचिवांच्या स्वाक्षरीने ४९ महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.. विद्यापीठाचे या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ही आहेत १८ महाविद्यालये...
दादासाहेब रमेशसिंग राजपुत बी.पी.एड महाविद्यालय, मलकापूर, जि. बुलडाणा (३२४) (१९९४)
ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, बुलढाणा. (३३८) (२००१)
व्यवसाय प्रशासन महाविद्यालय, जांभरुन रोड, ता. जि. बुलडाणा. (३४७) (२००६)
सत्यजित कॉलेज ऑफ सायन्स, मेहकर, ता. मेहकर, जि. बुलडाणा, (३५१) (२००७)
सावित्रीबाई फुले विज्ञान महाविद्यालय, सिंदखेड राजा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा. (३५२) (२००७)
कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, खामगांव, ता. खामगांव, जि. बुलडाणा. (३५३) (२००७)
स्व. गजानन माणिकरावजी गावंडे विज्ञान महाविद्यालय, खामगांव, ता. खामगांव, जि. बुलडाणा. (३६४) (२००८)
स्व. गणेश भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, देऊळगांव मही, ता. देऊळगांव राजा,जि.बुलडाणा (३६८) (२००८)
सरस्वती कॉलेज, गौलखेड रोड, शेगांव, जि. बुलडाणा (३७३) (२००९)
महात्मा ज्योतिबा फूले विज्ञान महाविद्यालय, संग्रामपुर, जि. बुलडाणा (३७४) (२००९)
संत गजानन बाबा महाविद्यालय, मोताळा, जि. बुलडाणा, (३८६) (२०१०)
डॉ. जाकिर हुसेन हिन्दी/उर्दू कला महाविद्यालय, रेटट बँकेजवळ, लोणार बैंक जवळ, लोणार, जि. बुलडाणा (३९२) (२०१६)
श्री. सावळे महाविद्यालय, लाखनवाडा बु., लाखनवाडा, ता. खामगांव, जि. बुलडाणा (३९३) (२०१६)
श्री. सरस्वती कला, बाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा (३९४) (२०१७)
कै. कमलाबाई बनमेरु कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार, जि. बुलडाणा (३१८) (२०१८)
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे इन्स्योट्युट ऑफ फार्मसी, खामगांव रोड, चिखली, ता. चिखली, जि. बुलडाणा (४००) (२०१९)
डॉ. आर. एन. लाहोटी इन्स्टीट्यूट ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशन ऑफ रिसर्च सेन्टर, सुलतानपुर, ता. लेणार, जू. बुलडाणा (१००१) (२०११)
श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, सागबन रोड, पाळघराजवळ, बुलडाणा. (१००२) २०१९)