अमोल गायकवाड जिल्ह्याचे नवे ॲडिशनल एसपी! बी. बी. महामुनी यांची रत्नागिरीत बदली....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा अपर पोलीस अधीक्षक पदी अमोल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते समादेशक, आयआरबी २, रा.रा. पोलीस बल गट क्र. १५, धबरसी कॅम्प, गोंदिया येथे कार्यरत होते. शासनाच्या गृह विभागाने काल ७ जुलै रोजी ही बदली केली असून, लवकरच गायकवाड हे बुलढाणा अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

 गृहविभागाने काल ७ जुलै रोजी भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवतील २५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहे. यामध्ये बुलडाणा अपर पोलीस अधीक्षक पदी अमोल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या आठवड्यात बुलढाणा अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांची रत्नागिरी येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात एक महत्त्वाचा दुवा तात्पुरता अनुपस्थित होता. आता अमोल गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे ही पोकळी भरून निघाली आहे.