विज पडून म्हशीचा मृत्यू! सवणा येथील घटना...

 
 सवणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सवणा येथे वीज पडून म्हशीचा मृत्यू झाला. काल,२४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
विठ्ठल पंढरी करवंदे यांच्या शेतात निंबाच्या झाडाखाली म्हैस बांधलेली होती. झाडावर वीज पडल्याने झाडाखाली बांधलेली म्हैस दगावली. यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.