

बुलडाणा जिल्ह्यातील ५ पर्यटक पहेलगाम मध्ये अडकलेत!
Apr 23, 2025, 10:54 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जम्मू कश्मीरमधील पहेलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांना जिवानिशी ठार मारले आहे..आतापर्यंत २६ पर्यटक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे, दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील पाच पर्यटक देखील सध्या पहेलगामध्ये अडकले आहेत. दहशतवाद्यांनी जेव्हा फायरिंग केली तेव्हा ते जवळच्याच एका हॉटेलमध्ये मध्ये, फिरण्यासाठी ते थोड्याच वेळात बाहेर पडणार होते मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे हॉटेल चालकांनी त्यांना बाहेर पडू नका असे सांगितले..सध्या ते हॉटेलमध्येच आहेत.
व्हाईस ऑफ मीडियच्या राज्य कोर कमिटीचे सदस्य तथा सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचे लहान बंधू निलेश जैन,पत्नी व मुले असे ५ जण सध्या पहेलगाम मध्ये आहेत. पर्यटनासाठी ते जम्मू-काश्मीरला गेले होते. काल दहशतवादी हल्ला झाला तेव्हा जैन कुटुंब हॉटेल मधून बाहेर पडण्यासाठी निघण्याच्या तयारीत होते. मात्र फायरिंगचा आवाज आल्यानंतर हॉटेल चालकांनी त्यांना बाहेर जाऊ दिले नाही. निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ. श्वेता निलेश जैन आणि अनुष्का निलेश जैन असे ५ जण हॉटेलमध्ये अडकले आहेत. सध्या ते सुखरूप आहेत, फायरिंगच्या आवाजाने ते प्रचंड घाबरले होते असे त्यांनी सांगितले. दरम्यान पहेलगामधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.