Update : 3 तालुक्यांत कोरोनाचे धोकादायक कमबॅक! जिल्ह्यात 654 पॉझिटिव्ह; चौघे दगावले

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही दिवसांपासून शांत असलेल्या तीन तालुक्यांत कोरोनाने केलेले दमदार व धोकादायक पुनरागमन व जिल्ह्यात 654 पॉझिटिव्ह आणि चौघा रुग्णांचे बळी हा गत् 24 तासांतील कोरोनाचा पराक्रम! कडकडीत निर्बंधांच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसाला कोविडकुमारने दिलेली ही सलामी ठरली!! तांत्रिक अडचणींमुळे स्वॅब नमुने तपासणीचा वेग गत् 3 दिवसांत मंदावला. यामुळे …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काही दिवसांपासून शांत असलेल्या तीन तालुक्यांत कोरोनाने केलेले दमदार व धोकादायक पुनरागमन व जिल्ह्यात 654 पॉझिटिव्ह आणि चौघा रुग्णांचे बळी हा गत्‌ ‌24 तासांतील कोरोनाचा पराक्रम! कडकडीत निर्बंधांच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसाला कोविडकुमारने दिलेली ही सलामी ठरली!!

तांत्रिक अडचणींमुळे स्वॅब नमुने तपासणीचा वेग गत्‌ 3 दिवसांत मंदावला. यामुळे अहवाल मिळण्यास जादा कालावधी लागत आहे. परिणामी प्रयोगशाळांमधील अधिकारी व  कर्मचाऱ्यांवरील ताण वाढलाय, या पार्श्वभूमीवर गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात 654 पॉझिटिव्ह निघाले. काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या खामगाव 148, चिखली 104, लोणार 105 या तालुक्यांनी पार केलेली शतके धोक्याचा इशारा ठरलाय! याशिवाय बुलडाणा 76, देऊळगाव राजा 71, मलकापूर 39, मोताळा 38, सिंदखेडराजा 21 अशी रुग्ण  संख्या आहे. या तुलनेत मेहकर 7, जळगाव जामोद 13, संग्रामपूर 11, नांदुरा 17, शेगाव 13 या तालुक्यांतील संख्या कमी आहे. मात्र प्राप्त अहवालांची संख्या कमी झाल्याने पॉझिटिव्ह कमी दिसताहेत ही यातील खरी गोम आहे.

खामगावमध्ये तिघे दगावले…

दरम्यान, कोरोना बळींची संख्या झपाट्याने 500 च्या आकड्याकडे वाटचाल करत आहे. 10 मे रोजी ही संख्या 481 इतकी होती. आज त्यात चौघांची भर पडली आहे. उपचारादरम्यान कंझारा (ता. खामगाव) 55 वर्षीय महिला, जलंब नाका खामगाव येथील 42 वर्षीय पुरुष, सुनगाव ता. जळगाव जामोद येथील 60 वर्षीय पुरुष, धाड ता. बुलडाणा येथील 60 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

3936 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4590 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3936 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 654 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 376 व रॅपिड टेस्टमधील 278 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1414 तर रॅपिड टेस्टमधील 2522 अहवालांचा समावेश आहे.

4080 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

आज 943 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 393120 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 68170 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3927 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 393120 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 72735 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात 4080 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 485 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.