…म्‍हणून लोकप्रतिनिधी म्‍हटलं की कासारखेडच्‍या ग्रामस्‍थांच्‍या कपाळावर पडतात आठ्या!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कासारखेडमध्ये लोकप्रतिनिधी म्हटलं की ग्रामस्थांच्या कपाळ्यावर आठ्या पडतात… याला कारणही तसेच आहे, गेल्या कित्येक महिन्यांपासून कासारखेड ते पेनटाकळी रस्त्याच्या कामासाठी ते प्रयत्नरत आहेत. लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत सर्वांचे उंबरठे त्यांनी झिजवून झाले आहेत. मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे मते घ्यायला येणाऱ्यांना आमच्या समस्या दिसत नाहीत का, असा प्रश्न ग्रामस्थ …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कासारखेडमध्ये लोकप्रतिनिधी म्‍हटलं की ग्रामस्‍थांच्‍या कपाळ्यावर आठ्या पडतात… याला कारणही तसेच आहे, गेल्या कित्‍येक महिन्यांपासून कासारखेड ते पेनटाकळी रस्‍त्‍याच्‍या कामासाठी ते प्रयत्‍नरत आहेत. लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत सर्वांचे उंबरठे त्‍यांनी झिजवून झाले आहेत. मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्‍यामुळे मते घ्यायला येणाऱ्यांना आमच्या समस्या दिसत नाहीत का, असा प्रश्न ग्रामस्‍थ करत आहेत.

या रस्‍त्‍याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्‍था झाली आहे. कळंबेश्वर, थार, सारसीव, खुदनापुर या भागातील नागरिकांना याच रस्‍त्‍याने चिखली, मेहकरला येजा करावी लागते. पावसामुळे सध्या रस्ता चिखलमय झाला आहे. कासारखेड गावातील लोकांना या रस्‍त्‍याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादक आहेत. मात्र रस्‍त्‍याची अवस्‍था अशी झाली आहे की तीनचाकी वाहनही मालवाहतूक करू शकत नाही. कासारखेड ग्रामपंचायतीने आणि गावातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून हा रोड करण्यासाठी निवेदन दिली. पण राजकारण्यांनीही गावकऱ्यांची केवळ आश्वासनावर बोळवण केली आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर पेनटाकळी कासारखेड रोडचे डांबरीकरण करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.