‘रेमडेसिविर’चा काळाबाजार रोखण्यासाठी सरसावले आमदार गायकवाड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यातील काळाबाजार रोखण्यासाठी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड सरसावले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली. हे इंजेक्शन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांच्या देखरेखीखाली रुग्णांच्या नातेवाइकांना देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश यंत्रणेला दिले. कोविडचा स्कोर 9 टक्क्यांपेक्षा जास्त असला तरच त्याला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रेमडेसिविर इंजेक्‍शनचा जिल्ह्यातील काळाबाजार रोखण्यासाठी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड सरसावले आहेत. त्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली. हे इंजेक्‍शन उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांच्‍या देखरेखीखाली रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना देण्यात यावे, अशी मागणीही त्‍यांनी केली. त्‍यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश यंत्रणेला दिले.

कोविडचा स्‍कोर 9 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त असला तरच त्‍याला रेमडेसिविर इंजेक्‍शनची गरज पडते. मात्र काही डॉक्‍टर रुग्‍णांकडून पैसे उकळण्यासाठी हे इंजेक्‍शन देत असल्‍याचा आरोप श्री. गायकवाड यांनी केला आहे. आता हे इंजेक्‍शन अतिगंभीर रुग्‍णांनाच देण्यात येणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी म्‍हटले आहे. मी मुख्यमंत्री व आरोग्‍य मंत्र्यांच्‍या संपर्कात असून, या कठीण प्रसंगात जनतेसोबत आहे, असेही आमदार गायकवाड म्‍हणाले.