१५ शेतकरी कुटुंब वैतागून तहसीलसमोर बसले उपोषणाला!; चिखलीतील आंदोलन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात जाण्याचा वडिलोपार्जित, जुना वहिवाट रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी आज, 21 जूनला कोलारा येथील शेतकऱ्यांनी चिखली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. कोलारा (ता. चिखली) येथील गट नं. 107,108,109,110 मध्ये अशोक भावसिंग सोळंके व इतर 14 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मात्र या शेतात जातात जाण्यासाठी वडिलोपार्जित असलेला जुना वहिवाटीचा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतात जाण्याचा वडिलोपार्जित, जुना वहिवाट रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी आज, 21 जूनला कोलारा येथील शेतकऱ्यांनी चिखली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

कोलारा (ता. चिखली) येथील गट नं. 107,108,109,110 मध्ये अशोक भावसिंग सोळंके व इतर 14 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मात्र या शेतात जातात जाण्यासाठी वडिलोपार्जित असलेला जुना वहिवाटीचा रस्ता अडवण्यात आल्याने त्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या वर्षी शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने सोयाबीनच्या सुड्या सडल्या होत्या.

यासंबंधी शेतकऱ्यांनी तहसीलदार चिखली, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी,आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या वारंवार भेटी घेऊन समस्या मांडल्या. चिखलीच्या तहसीलदारांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. यावर्षी पेरणीपूर्वी शेतरस्ता खुला करून घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे केली होती. मात्र त्यावरही कोणतीच कार्यवाही न झाल्याने आजपासून कोलारा येथील 15 शेतकरी कुटूंब बेमुदत उपोषणाला बसले आहेत.