हिवरा आश्रममध्ये अवैध दारू विक्री जोमात, तरुण पिढी होतेय व्यसनाधीन, महिला त्रस्‍त; सरपंचांचे ठाणेदारांना साकडे

हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आध्यात्मिक केंद्र व प. पू. शुकदास महाराज यांची कर्मभूमी असलेल्या हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथे काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. त्यामुळे गावातील महिला त्रस्त झाल्या आहेत. तरुण पिढी, मजूरवर्ग व्यसनाधीन होत चालला आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत असल्याची तक्रार सरपंच सौ. प्राजक्ता नितीन इंगळे यांनी साखरखेर्डा …
 

हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आध्यात्मिक केंद्र व प. पू. शुकदास महाराज यांची कर्मभूमी असलेल्या हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथे काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. त्‍यामुळे गावातील महिला त्रस्‍त झाल्या आहेत. तरुण पिढी, मजूरवर्ग व्यसनाधीन होत चालला आहे. त्‍यामुळे सामाजिक स्वास्‍थ बिघडत असल्याची तक्रार सरपंच सौ. प्राजक्‍ता नितीन इंगळे यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्‍याकडे केली आहे. पोलीस आता या तक्रारीला किती गांभीर्याने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.