स्मशानभूमीत वाढदिवस… ठाणेदार जितेंद्र आडोळेंनी वृक्षांचे पालकत्‍वही स्वीकारले!

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत मलकापूर पांग्रा येथील स्मशानभूमी आणि कबरस्तानमध्ये वृक्षारोपण केले. ठाणेदार आडोळे यांच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्ड्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यांनी स्वतःही रक्तदान केले. त्यानंतर मलकापूर पांग्रा येथे स्मशानभूमीत आणि कब्रस्तानमध्ये …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत मलकापूर पांग्रा येथील स्मशानभूमी आणि कबरस्तानमध्ये वृक्षारोपण केले.

ठाणेदार आडोळे यांच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्ड्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्‍यांनी स्वतःही रक्तदान केले. त्यानंतर मलकापूर पांग्रा येथे स्मशानभूमीत आणि कब्रस्तानमध्ये जाऊन कडुलिंब आणि विविध वृक्षांचे रोपण केले. या वृक्षांचे पालकत्वही त्‍यांनी स्वीकारले. यावेळी पत्रकार भगवान साळवे, पत्रकार बाजीराव वाघ, वसीम शेख, वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अश्विन सानप, माजी सरपंच अहेमद खुदायरखाँ, ग्रा.पं. सदस्य नामदेव उगले, माजी सरपंच साबेर पठाण, बुढन चौधरी, शेख सिराज, जनार्दन कुटे, गणेश मिसाळ, पत्रकार अमोल साळवे, अनिल भांगडिया, आशिष बियाणी मदन मुट्ठे, मनसेचे संदीप निकाळजे, बाळू देशमुख अमोल पैठणे, दिनकर बावरे,अनिल साळवे, राजू साळवे, शेख शमशेर, आदिनाथ साळवे, सुनील काकडे, संतोष तायडे, शेख अहेमद, शबीर पठाण जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते.