सिंदखेड राजा ः ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणाचा दुसरा टप्पाही उत्साहात

सिंदखेडराजा (विनोद साळवे ः बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः 15 जानेवारीला होऊ घातलेल्या तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा 9 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथील सहकार विद्या मंदिरात पार पडला. सकाळी 10:30 वाजता प्रशिक्षणाला सुरुवात झाली. यात निवडणूक निर्णय अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचा समावेश होता. प्रशिक्षणामध्ये मतदान नमुने भरणे, इव्हीएम हाताळणी, साहित्य वाटप व …
 

सिंदखेडराजा (विनोद साळवे ः बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) ः 15 जानेवारीला होऊ घातलेल्या तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा 9 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथील सहकार विद्या मंदिरात पार पडला. सकाळी 10:30 वाजता प्रशिक्षणाला सुरुवात झाली. यात निवडणूक निर्णय अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचा समावेश होता. प्रशिक्षणामध्ये मतदान नमुने भरणे, इव्हीएम हाताळणी, साहित्य वाटप व तपासणी या सारख्या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, नायब तहसीलदार प्रवीन लटके, एस. डी. बंगाळे, बी. डी. घुगे आर.आर कराळे आदींची उपस्थिती होती.