सिंदखेड राजात हवा हाय स्पीड बुलेट ट्रेनचा थांबा!; काँग्रेसच्‍या “या’ नेत्‍याने केली मागणी

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या सिंदखेड राजा तालुक्यात केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी हाय स्पीड बुलेट ट्रेनचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी सिंदखेड राजा काँग्रेस समितीतर्फे जुनेद अली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातून जात आहे. माँ जिजाऊंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजा …
 
सिंदखेड राजात हवा हाय स्पीड बुलेट ट्रेनचा थांबा!; काँग्रेसच्‍या “या’ नेत्‍याने केली मागणी

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या सिंदखेड राजा तालुक्यात केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी हाय स्पीड बुलेट ट्रेनचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी सिंदखेड राजा काँग्रेस समितीतर्फे जुनेद अली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे.

केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातून जात आहे. माँ जिजाऊंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातून तो जात आहे. त्‍यामुळे या शहरात किंवा तालुक्यात हाय स्पीड बुलेट ट्रेनचा थांबा देण्यात यावा. या मागणीला कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणताही नेता विरोध करण्याचा प्रश्नच येणार नाही. कारण माँ जिजाऊंच्या नावाने आणि शिवाजी महाराजांच्या विचाराने सर्वच राजकीय पक्ष राजकारणी मताचा जोगवा मागत असतात, असेही निवेदनात म्‍हटले आहे.