सफाई कामगारांचा “पीएफ’ भरलाच नाही!; देऊळगाव राजात नगरपालिकेसमोर उपोषण सुरू!!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या पगारातून ईपीएफ फंड कपात करून तो भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न केल्याने झालेल्या अनियमितेचा भांडफोड करा व संबंधित आधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी ११ ऑक्टोबरपासून नगरपालिकेसमोर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नगरपालिकेतील सफाई कामगार …
 
सफाई कामगारांचा “पीएफ’ भरलाच नाही!; देऊळगाव राजात नगरपालिकेसमोर उपोषण सुरू!!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या पगारातून ईपीएफ फंड कपात करून तो भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न केल्याने झालेल्या अनियमितेचा भांडफोड करा व संबंधित आधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी ११ ऑक्‍टोबरपासून नगरपालिकेसमोर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

नगरपालिकेतील सफाई कामगार अहमेद बेग महमंद बेग, संजय तुळशिराम चित्तेकर, सुनिता राधेश्याम खरात, मालती अनिल सुनगत, मंगला कचरू हिवाळे, गोकुळ रामचरण सुनगत या कर्मचाऱ्यांचे ईपीएफ फंड हा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न करता इतरत्र वळवल्याचा आरोप खरात यांनी केला आहे. नगरपालिका प्रशासन दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे शेवटी गांधी मार्गाने उपोषण सुरू केल्याचे त्‍यांनी सांगितले. नि. क. सं .चे जिल्हाध्यक्ष कमांडर अशोक राऊत, शिवसेना नेते दीपक बोरकर, डी. आर. साळवे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दाखोकर, शिवसंग्रामचे जहीर खान पठाण तसेच विविध संघटना, राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.