शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऐवजी १२ ऑगस्टला होणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः परीक्षा परिषदेमार्फत पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र राज्यात काही जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली. …
 
शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऐवजी १२ ऑगस्टला होणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः परीक्षा परिषदेमार्फत पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र राज्यात काही जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्‌भवलेली पूर परिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली. या निवेदनांचा विचार करता ही परीक्षा ९ ऑगस्ट ऐवजी आता १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी निगर्मित करण्यात आलेले प्रवेशपत्र १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.