वाहऽऽ आजीबाई… 80 वर्षांच्‍या आजीबाईची कोरोनाला धोबीपछाड!

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोरोनाने सारेच घायाळ झाले आहेत. अगदी तरुणाईला सुद्धा कोरोनाने सोडले नाही. पन्नाशी पार केलेल्या रुग्णांना कोरोनाचा जास्त धोका असतो. दगावलेले बहुतांश रुग्ण पन्नाशी पार केलेलेच आहेत. त्यामुळे या वयात कोरोना झाला की वृद्धमंडळी हतबल होताना आपण पाहतो. पण या मंडळींसाठी प्रेरणादायी असे काम लोणारच्या आजीबाईने केले आहे. 80 …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कोरोनाने सारेच घायाळ झाले आहेत. अगदी तरुणाईला सुद्धा कोरोनाने सोडले नाही. पन्नाशी पार केलेल्या रुग्‍णांना कोरोनाचा जास्त धोका असतो. दगावलेले बहुतांश रुग्‍ण पन्नाशी पार केलेलेच आहेत. त्‍यामुळे या वयात कोरोना झाला की वृद्धमंडळी हतबल होताना आपण पाहतो. पण या मंडळींसाठी प्रेरणादायी असे काम लोणारच्‍या आजीबाईने केले आहे. 80 वर्षांच्‍या आजीला कोरोनाने पछाडले. पण आजीबाईने कोरोनाला असा धुतला की तो आजीबाईंना सोडून पसार झाला… आता आजीबाईच्‍या या धाडसाची चर्चा अवघ्या लोणारमध्ये होत आहे. कोरोना झाला की भयभीत होणाऱ्या मंडळींत जणू आजीने नवा जोशच भरला आहे.

लोणार येथील प्रतिष्ठित व्यापारी असलेल्या महावीर कापड केंद्राच्‍या मालकाच्‍या मातोश्री सौ. लीलाबाई माणकचंद जैन यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ बीड येथील संजीवनी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. विशाल कोचेटा यांच्या निगराणीत  त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दहा-बारा दिवस कोरोनाशी झुंज देऊन, त्‍याला पार लोळवून आज, 21 मे रोजी त्‍या घरी सुखरुप पोहोचल्या. 80 वर्षे वय असूनही कोरोनाला न घाबरता त्यांनी दिलेला लढा नक्‍कीच सर्वांना हुरूप देणारा आहे. आज त्या ठणठणीत आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण आहे. डॉ. विशाल कोचेटा, डॉ. भारत दुरगुडे, डॉ. संकेत बाहेती आदींनी परिश्रम घेतल्‍याचे त्‍यांच्‍या नातेवाइकांनी सांगितले.