लोणार तालुक्यात अतिवृष्टी!; जिल्ह्यात संततधार!; सहा तलाव भरले, सरासरी 36.6 मि. मी. पावसाची नोंद

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पर्जन्यराजाने चांगलीच मनसोक्त बरसात केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सूर्यदर्शन होत नसून, सारखी पावसाची रिपरिप सुरू आहे. कुठे मध्यम तर कुठे तुरळक स्वरूपात बरसणारा पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ करीत आहे. जिल्ह्यात लोणार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्वात जास्त 77.4 मि. मी. पाऊस झाला आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पर्जन्यराजाने चांगलीच मनसोक्त बरसात केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून सूर्यदर्शन होत नसून, सारखी पावसाची रिपरिप सुरू आहे. कुठे मध्यम तर कुठे तुरळक स्वरूपात बरसणारा पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ करीत आहे. जिल्ह्यात लोणार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्वात जास्त 77.4 मि. मी. पाऊस झाला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 36.6 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस असा ः (कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची) बुलडाणा : 35.5 मि.मी. (326.3), चिखली : 41.4 (414.6), देऊळगाव राजा : 42.5 (325.2), सिंदखेड राजा : 55.3 (483), लोणार : 77.4 (444.5), मेहकर : 50.3 (549.6), खामगाव : 26.7 (347.2), शेगाव : 43.3 (165.9), मलकापूर : 14.1 (174.2), नांदुरा : 12.8 (210), मोताळा : 15.9 (225.2), संग्रामपूर : 32.3 (292.6), जळगाव जामोद : 28.7 (143.3). जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4101.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी 315.5 मि. मी. आहे. आतापर्यंत सर्वात कमी 143.3 मि.मी. पावसाची नोंद जळगाव जामोद तालुक्यात झाली आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा असा ः (आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी) – नळगंगा : 19.69 द.ल.घ.मी. (28.41), पेनटाकळी :19.494 दलघमी (32.49), खडकपूर्णा :6.450 दलघमी (6.90), पलढग : 1.17 दलघमी (15.63), ज्ञानगंगा : 23.90 दलघमी (70.44), मन : 21.84 दलघमी (59.31), कोराडी : 15.20 दलघमी (100), मस : 7.35 दलघमी (48.88), तोरणा : 2.68 दलघमी (34.01) व उतावळी : 11.92 दलघमी (60.31).

100 टक्के पाणीसाठा असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पांची माहिती
जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे 6 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे. त्‍यात टाकळी (ता. खामगाव), निमखेड (ता. खामगाव), शिवणी जाट (ता. लोणार), बोरखेडी (ता. लोणार), गांधारी (ता. लोणार), गारखेड (ता. सिंदखेड राजा) या प्रकल्पांचा समावेश आहे.