लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय व्‍यावसायिक आर्थिक संकटात; सरकारकडे केली भरपाईची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय व्यवसायिक व संलग्न छोटेमोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यांना सरकारने आर्थिक पॅकेज देऊन भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा लॉन्स- मंगल कार्यालय चालक-मालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आज मंगल कार्यालय व्यावसायिकांनी याबाबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन मागणी मांडली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय व्‍यवसायिक व संलग्न छोटेमोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्‍यांना सरकारने आर्थिक पॅकेज देऊन भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा लॉन्स- मंगल कार्यालय चालक-मालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे. आज मंगल कार्यालय व्‍यावसायिकांनी याबाबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन मागणी मांडली असता त्‍यांनी सकारात्‍मक प्रतिसाद दिल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कायस्‍थ यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले.

निवेदनात म्‍हटले आहे, की विवाहकार्य सुरळीत होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. कोरोना प्रादुर्भावामुळे कार्यालयासंबंधी नियमावली तयार करावी. नियमांचे पालन करून क्षमतेपेक्षा 50 टक्‍के क्षमतेने किंवा 200 लोकांच्‍या उपस्‍थितीची सरसकट परवानगी द्यावी. मार्च 2020 पासून मार्च 2021 पर्यंत कर्ज सरसकट माफ करावे. लॉन्समालक -चालक यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे दाखल करू नये आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कायस्‍थ, जिल्हा कार्याध्यक्ष संजय मैंद, जिल्हा सचिव दिलीप जाधव पाटील यांच्‍या सह्या आहेत.