मै तो साब बन गया… 182 पोलिसांना नवीन वर्षाचे गिफ्ट! जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले प्रमोशन

बुलडाणा (कृष्णा सपकाळ) ः जिल्ह्यातल्या 182 पोलीस कर्मचार्यांचे प्रमोशन करत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. काल वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही अनोखी भेट पोलिसांच्या कुटुंबियांना दिली आहे. 51 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. 66 पोलीस शिपायांना पोलीस नाईक पदावर बढती देण्यात आली तर 65 पोलीस …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ) ः जिल्ह्यातल्या 182 पोलीस कर्मचार्‍यांचे प्रमोशन करत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट दिले आहे. काल वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही अनोखी भेट पोलिसांच्या कुटुंबियांना दिली आहे. 51 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. 66 पोलीस शिपायांना पोलीस नाईक पदावर बढती देण्यात आली तर 65 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार करण्यात आले आहे. बढती मिळाल्यामुळे वेतनश्रेणीत ही वाढ होणार असल्याने पोलीस कर्मचार्‍यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी प्रमोशन देण्यात आलेल्या सर्व पोलिसांचे व कुटुंबियांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.