भगव्याचा असाही सन्मान!; वाचूनच बाहेर पडतील कौतुकोद्गार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दरवर्षी शिवजयंती, महाराणा प्रताप जयंती निमित्त शहरभर भगवे ध्वज लावल्या जातात.एकदा ध्वज लावल्यानंतर मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष होते. उन्हाने त्याचा रंग फिकट होते.ते जीर्ण होतात आणि फाटतातही. अशा जीर्ण झालेल्या ध्वजाला काढून त्याला सन्मानपूर्वक तलावात सोडण्याचा स्तुत्य उपक्रम चिखलीचे नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी हातात घेतला आहे. भगव्या ध्वजाला साक्षी ठेवूनच छत्रपती …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दरवर्षी शिवजयंती, महाराणा प्रताप जयंती निमित्त शहरभर भगवे ध्वज लावल्या जातात.एकदा ध्वज लावल्यानंतर मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष होते. उन्हाने त्याचा रंग फिकट होते.ते जीर्ण होतात आणि फाटतातही. अशा जीर्ण झालेल्या ध्वजाला काढून त्याला सन्मानपूर्वक तलावात सोडण्याचा स्तुत्य उपक्रम चिखलीचे नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी हातात घेतला आहे. भगव्या ध्वजाला साक्षी ठेवूनच छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भगवा हा त्याग, बलिदान आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. भगव्या ध्वजाने प्रेरणा मिळते. त्यामुळे ध्वजाचा अवमान न होता ते जीर्ण आणि फिकट होण्यापूर्वी काढून टाकत त्याचे तलावात सन्मानपूर्वक विसर्जन करणार असल्याचे नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी सांगितले.