बुलडाणा : सुंदरखेडमध्ये कडक निर्बंधांच्‍या काळात 17 हजारांचा दंड वसूल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंधाच्या काळात बेजबाबदार नागरिकांवर बुलडाणा शहराचाच भाग बनलेल्या सुंदरखेड ग्रामपंचायतीनेही कारवाईची मोहीम राबवली. यातून गेल्या 9 दिवसांत 17300 रुपयांचा दंड वसूल झाला. विनाकारण फिरणारे, मास्क न लावणारे, दुकाने उघडणाऱ्यांकडून हा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम ग्रामविकास अधिकारी विलास मानवतकर, ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर राजपूत, राकेश जाधव, मनोज नरवाडे,वैभव टेकाळे, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंधाच्‍या काळात बेजबाबदार नागरिकांवर बुलडाणा शहराचाच भाग बनलेल्या सुंदरखेड ग्रामपंचायतीनेही कारवाईची मोहीम राबवली. यातून गेल्या 9 दिवसांत 17300 रुपयांचा दंड वसूल झाला. विनाकारण फिरणारे, मास्क न लावणारे, दुकाने उघडणाऱ्यांकडून हा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम ग्रामविकास अधिकारी विलास मानवतकर, ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर राजपूत, राकेश जाधव, मनोज नरवाडे,वैभव टेकाळे, अभिषेक देशमुख यांच्‍यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.