बुलडाणा -खामगाव बोथामार्गे वाहतूक सुरू; महिनाभरापासून बंद होता रस्ता!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्याच्या नुतनीकरणासाठी महिनाभरापासून बंद असलेली बुलडाणा -बोथा -खामगाव या मार्गावरील वाहतूक आज, 1 मार्चपासून सुरळीत करण्यात आली आहे. 30 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हा रस्ता बंद करण्यात आला होता. या दरम्यान हा मार्ग बुलडाणा- वरवंड- उंद्री- खामगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा आर्थिक व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रस्त्याच्या नुतनीकरणासाठी महिनाभरापासून बंद असलेली बुलडाणा -बोथा -खामगाव या मार्गावरील वाहतूक आज, 1 मार्चपासून सुरळीत करण्यात आली आहे. 30 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हा रस्ता बंद करण्यात आला होता. या दरम्यान हा मार्ग बुलडाणा- वरवंड- उंद्री- खामगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा आर्थिक व वेळेचा भुर्दंड व सोसावा लागत होता.
रात्री वाहतूक बंदच
विदर्भाची वनपंढरी म्हणून ओळख असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून रात्री 10 ते सकाळी 5 दरम्यान वाहतूक बंद असते. रात्री संचार करणाऱ्या वन्यजीवांना त्रास नको म्हणून हा निर्णय 2005 मध्येच घेण्यात आला होता. त्यामुळे रात्री हा रस्ता बंदच राहणार आहे.