बिबी येथील सैनिक किशोर काळुसे यांचे हार्टॲटॅकने अहमदनगरला निधन!

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिबी (ता. लोणार) येथील जवान किशोर काळुसे यांचे हृदविकाराच्या झटक्याने अहमदनगर येथे काल, ४ ऑगस्ट रोजी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ३२ वर्षां होते. जवान काळुसे वयाच्या १९ व्या वर्षी २००९ मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सिलिगुडी व पंजाबमधील जालंदर येथे देश सेवा केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये महाराष्ट्रातील …
 
बिबी येथील सैनिक किशोर काळुसे यांचे हार्टॲटॅकने अहमदनगरला निधन!

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिबी (ता. लोणार) येथील जवान किशोर काळुसे यांचे हृदविकाराच्या झटक्याने अहमदनगर येथे काल, ४ ऑगस्ट रोजी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ३२ वर्षां होते.

जवान काळुसे वयाच्या १९ व्या वर्षी २००९ मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सिलिगुडी व पंजाबमधील जालंदर येथे देश सेवा केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्पमध्ये त्यांची बदली झाली. ४ ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते नायब सुभेदार पदावर होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी व एक बहीण असा परिवार आहे. जवान किशोर काळुसे यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबिय, मित्र परिवारावर तसेच संपूर्ण बिबी गावावर शोककळा पसरली आहे.