बापरे बाप, जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात विषारी साप!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संपूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यातील दैनंदिन कामकाज एका अनाहूत पाहुण्याने काहीवेळ अनियंत्रित करून टाकलं! यामुळे काहीवेळ उडालेली खळबळ अखेर तज्ज्ञांच्या कारवाईनंतर शमली. आज, 2 मार्चला संध्याकाळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांचे चालक रवी तायडे हे कार बंगल्यात लावत होते. एवढ्यात त्यांची नजर सरपटणाऱ्या सापावर पडली. बॉडीगार्ड श्री. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संपूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यातील दैनंदिन कामकाज एका अनाहूत पाहुण्याने काहीवेळ अनियंत्रित करून टाकलं! यामुळे काहीवेळ उडालेली खळबळ अखेर तज्‍ज्ञांच्या कारवाईनंतर शमली.

आज, 2 मार्चला संध्याकाळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांचे चालक रवी तायडे हे कार बंगल्यात लावत होते. एवढ्यात त्यांची नजर सरपटणाऱ्या सापावर पडली. बॉडीगार्ड श्री. माळी यांनी तात्काळ सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना माहिती देताच ते बंगल्यात दाखल झाले. त्यांनी शिताफीने घोणस जातीचा अतिविषारी साप पकडून बरणी बंद केला. या विनानिमंत्रित पाव्हण्याला उद्या वन्य जीव कार्यालयात जमा करण्यात येणार आहे.