फॉरेस्टचे रेस्क्यू ऑपरेशन ः विहिरीत पडलेल्या अस्वलाला असे मिळाले जीवदान!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत जीवदान दिले. काल, 9 फेब्रुवारीच्या रात्री हे अस्वल डोंगरशेवली शिवारातील एका विहिरीत पडल्याचे आज सकाळी समोर आले होते. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर पथकाने येत अस्वलाला सुखरूप बाहेर काढून अभयारण्यात सोडले.चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी असलेले पाटीलबुवा बाहेकर यांचे डोंगरशेवली शिवारात …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत जीवदान दिले. काल, 9 फेब्रुवारीच्या रात्री हे अस्वल डोंगरशेवली शिवारातील एका विहिरीत पडल्याचे आज सकाळी समोर आले होते. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर पथकाने येत अस्वलाला सुखरूप बाहेर काढून अभयारण्यात सोडले.
चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी असलेले पाटीलबुवा बाहेकर यांचे डोंगरशेवली शिवारात शेत आहे. याच शेतातील विहिरीत अस्वल पडल्याचे आज सकाळी त्यांच्या निदर्शनास आल्याने याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच बुलडाणा डीएफओ अक्षय गजभिये, एसीएफ रणजीत गायकवाड यांच्या आदेशाने रेस्क्यू विभागाचे वनपाल राहूल चव्हाण, संदीप मांटे, विलास मेरत यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू ऑपरेशन करण्यापूर्वी परिसर निर्मनुष्य करण्यात आला. त्यानंतर विहिरीत खाट टाकून अस्वलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र ते अयशस्वी झाल्याने विहिरीत पिंजरा टाकून अस्वलाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अस्वलाला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले.