पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश… पुनर्वसन करताना शेतकरी, ग्रामस्थांचे हित जोपासा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसन करताना ग्रामस्थांचे हित जोपासावे. तसेच अरकचेरी प्रकल्पात बाधित शेतजमिनीचे भूसंपादन करताना तेथील शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज, ५ ऑगस्टला केली. जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेनटाकळी …
 
पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश… पुनर्वसन करताना शेतकरी, ग्रामस्थांचे हित जोपासा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेनटाकळी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसन करताना ग्रामस्थांचे हित जोपासावे. तसेच अरकचेरी प्रकल्पात बाधित शेतजमिनीचे भूसंपादन करताना तेथील शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज, ५ ऑगस्‍टला केली.

जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलामुळे बाधित झालेल्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पांढरदेव येथील घरांचे पुनर्वसन तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली.

या वेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री म्हणाले, की पुनर्वसन करताना एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून या गावांचे पुनर्वसन करावे. पुढील १५ दिवसांत गावकऱ्यांना प्लॉट वाटप करून त्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करावा. या गावाच्या पुनर्वसनाकरिता लागणार निधी लवकरात लवकर मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. संग्रामपूर तालुक्यातील अरकचेरी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेत जमिनीचा सर्व्हे करून संयुक्त मोजणी करण्यात यावी, असेही पालकमंत्र्यांनी सूचित केले. बैठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.