पाणीटंचाई निवारणासाठी 53 विंधन विहिरी ; 23 कुपनलिका मंजूर; 65 गावांत उपाययोजना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पाणीटंचाई निवारणार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील 25, चिखली तालुक्यातील 7, संग्रामपूरमधील 5, जळगाव जामोदमधील 5 व खामगाव तालुक्यातील 5 गावांसाठी 53 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यातील 7, जळगाव जामोद तालुक्यातील 5, शेगाव तालुक्यातील 6 कुपनलिकांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण 65 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : पाणीटंचाई निवारणार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील 25, चिखली तालुक्यातील 7, संग्रामपूरमधील 5, जळगाव जामोदमधील 5 व खामगाव तालुक्यातील 5 गावांसाठी 53 विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यातील 7, जळगाव जामोद तालुक्यातील 5, शेगाव तालुक्यातील 6 कुपनलिकांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण 65 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

सिंदखेड राजा तालुक्यातील सायाळा, आडगाव राजा, केशवशिवणी, किनगाव राजा, कुंबेफळ, मलकापूर पांग्रा, मोहाडी, साखरखेर्डा, शेंदुर्जन, नागझरी, देऊळगाव कोळ, धांदरवाडी, धानोरा, दुसरबीड, हिवरखेड पूर्णा, वर्दडी खुर्द, खामगाव, पिंपळगाव सोनारा, नशिराबाद, सोनोशी, सुलजगाव, तडेगाव, उमनगाव, वडाळी, वाघजई, चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा, शेलगाव जहागीर, मनुबाई, बोरगाव वसु, खैरव, पांढरदेव, किन्होळा, संग्रामपूर तालुक्यातील गुमठी, चिचारी, वसाडी नविन, वसाडी जुनी, शिवणी, जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी, प्यारसिंग टपरी, चाळीस टपरी, गोमाळ, मेंढामारी, खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रूक, जळका भडंग, पारखेड, ज्ञानगंगापूर या गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे, तर संग्रामपूर तालुक्यातील भोन जुने, भोन नविन, निवाणा, रूधाणा, एकलारा, आलेवाडी, जळगाव जामोद तालुक्यातील चालठाणा, सुनगाव, गोरखनाथ, ईसाई, शेगाव तालुक्यातील आडसूळ, भास्तन, डोलारखेड, घुई, कठोरा, सगोडा या गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.