पती वारल्यानंतर खचल्या नाहीत… लढल्या अन्‌ स्वतःसोबत दुर्बलांचेही आयुष्य केले सुकर!; किन्होळ्याच्‍या सुनीता बाहेकर यांचा आ. श्वेताताईंनी केला सत्‍कार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी उत्कृष्ट, आगळेवेगळे व इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले अशा नारीशक्तींचा नवरात्रीत सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पाचव्या माळेला किन्होळा येथील श्रीमती सुनीता सुनील बाहेकर यांचा आमदार सौ. श्वेताताईंनी साडी चोळी, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.1999 पासून 2008 पर्यंत …
 
पती वारल्यानंतर खचल्या नाहीत… लढल्या अन्‌ स्वतःसोबत दुर्बलांचेही आयुष्य केले सुकर!; किन्होळ्याच्‍या सुनीता बाहेकर यांचा आ. श्वेताताईंनी केला सत्‍कार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी उत्कृष्ट, आगळेवेगळे व इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले अशा नारीशक्तींचा नवरात्रीत सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पाचव्या माळेला किन्होळा येथील श्रीमती सुनीता सुनील बाहेकर यांचा आमदार सौ. श्वेताताईंनी साडी चोळी, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
1999 पासून 2008 पर्यंत सुनील तेजराव बाहेकर आजारी होते. त्यांचे 1999 मध्ये जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे ऑपरेशन झाले. 2008 मध्ये हार्ट अटॅकने अर्ध्यावर साथ सोडून गेले.

तेव्हा त्यांचा मुलगा शुभम फक्त 13 वर्षांचा होता. कुटूंबाची सर्व जबाबदारी सुनीता यांच्‍यावर आली. त्यांनी मुलाचे आयुष्य अधिक चांगले व्हावे यासाठी त्यांनी 2008 मधेच अबॅकस टीचर ट्रेनिंग घेतले. तेव्हापासून आजपर्यंत चार ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना घडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात त्या सामाजिकदृष्ट्या आर्थिक दुर्बल मुलांना पैशाअभावी कोणतीच अडचण कधीच येऊ देत नाही. शक्य ती मदत त्यांना करतात. त्‍यांनी थेरपी सेंटर सुरू केले. रुग्णसेवा अजूनही सुरू आहे. 2000 ते 2010 चे साक्षरता मिशन त्यांनी स्वतः आपल्या किन्होळा गावात राबून स्वतः निरक्षरांना शिकवून ९९ टक्‍के साक्षर केले.

सोबतच राजीव गांधी संधी शाळामध्ये अपंग मतिमंद मुलांना शिकवून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मुलाला त्यांनी अकोला, औरंगाबाद, पुणे येथे शिक्षण दिले. आता तो यूपीएससी तयारी करत आहे. 26 वर्षांचा आहे. 1-1 रुपया साचवून चिखली शहरात त्यांनी स्वतःचे घर घेतले आणि सर्व महिलांना प्रेरणा मिळेल अशी स्वतःची ओळख निर्माण केली. त्‍यांच्‍या सन्‍मानप्रसंगी प्रभूकाका बाहेकर, शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख, प्रा. वीरेंद्र वानखेडे, पद्मनाभ बाहेकर, जिल्हा संपर्कप्रमुख ,संजूकाका बाहेकर, संदीप बाहेकर, डिगांबर बाहेकर, विष्णू बाहेकर, मधुकर बाहेकर उपस्थित होते.