निमित्ताला कारण ‘कोरोना’चे… पॉली क्लिनिक 14 दिवसांसाठी लॉक! शेकडो माजी सैनिकांसह कुटुंबियांवर खासगी रुग्‍णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नजीक माजी सैनिकांसाठी असलेले पॉली क्लिनिक तब्बल 14 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याने शेकडो माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या कारणावरून हे रुग्णालय बंद करण्यात आले आहे. माजी सैनिक …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः  बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नजीक माजी सैनिकांसाठी असलेले पॉली क्लिनिक तब्बल 14 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याने शेकडो माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्‍या कारणावरून हे रुग्णालय बंद करण्यात आले आहे.

माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांसाठी येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय परिसरात (बुलडाणा बस स्थानकासमोरील परिसरात)  इसिएचएस पॉली क्लिनिक कार्यरत आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व अन्य पॅरा मेडिकल कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या पॉली क्लिनिकमधील तब्बल 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने 16 मार्चपासून पुढील 14 दिवसांकरिता हे रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे. 4 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघणे ही दुर्दैवी व धक्कादायक बाब असली तरी हे रुग्णालय तब्बल 14 दिवसंकरिता बंद ठेवण्यात आल्याने शेकडो माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांच्‍यावर  खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची पाळी आली आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यावर सर्व दक्षता, सॅनिटाईज केल्यावर हे रुग्णालय 2- 3 दिवसात सुरू करणे आवश्यक व अपेक्षित होते. वानगीदाखल बुलडाणा तहसील कार्यलयामधील तब्बल 21 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यावरही ते पूर्ववत सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे आरोग्य सेवा विषयकही आस्थापना बंद ठेवणे कितपत रास्त, असा सवाल उपस्थित झाला आहे. यामुळे कर्तव्यदक्ष  जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, आरडीसी दिनेश गीते, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था करून हे पॉली क्लिनिक तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे. लोकप्रतिनिधिनी सुद्धा यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज ठरली आहे.