नवीन वर्षात गारठा झाला कमी; किमान तापमान 17 डिग्रीच्या घरात

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवीन वर्षात बुलडाणा शहर परिसरातील गारठा कमी झाला असून, तापमापकाचा पारा 17 डिग्रीच्या घरात पोहोचला आहे. यामुळे लाखांवर रहिवासी सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. सरत्या वर्षात 29 डिसेंबरला किमान तापमान 12.4 तर 30 डिसेंबरला 13.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले होते. यामुळे नवीन वर्षात किमान तापमान याच रेंजमध्ये …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवीन वर्षात बुलडाणा शहर परिसरातील गारठा कमी झाला असून, तापमापकाचा पारा 17 डिग्रीच्या घरात पोहोचला आहे. यामुळे लाखांवर रहिवासी सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. सरत्या वर्षात 29 डिसेंबरला किमान तापमान 12.4 तर 30 डिसेंबरला 13.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले होते. यामुळे नवीन वर्षात किमान तापमान याच रेंजमध्ये राहील हा अंदाज मात्र चुकीचा ठरला. थर्टी फर्स्टला 15.4 डिग्रीच्या किमान तापमानाने जिल्हावासीयांच्या एन्जॉयमध्ये अडचण आणली नाही! यापाठोपाठ 1 जानेवारीला किमान तापमान 16.4 डिग्री तर आज 2 जानेवारीला 16.8 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. यामुळे किमान तापमानात क्रमाने घट होत असल्याचे चित्र आहे. यामुळे लहान बालक, वयोवृद्ध, रुग्ण, दमेकरी, कोविड रुग्णांना दिलासा मिळाला आहे.