धनदांडग्यांना घरकुल देता अन्‌ गरीबाले कवा देणार..?; त्‍या सात जणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसल्या उपोषणाला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाभूळखेड (ता. मेहकर) येथील सात महिला घरकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल, २६ जुलैपासून बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. आजही त्यांचे आंदोलन सुरूच होते, मात्र अद्याप तरी कोणत्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी बुलडाणा लाइव्हकडे व्यक्त केली. उपोषणाला बसलेल्या सातही महिला भूमिहीन व दारिद्र्य रेषेखालील आहेत. पंतप्रधान आवास योजनेसाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाभूळखेड (ता. मेहकर) येथील सात महिला घरकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल, २६ जुलैपासून बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. आजही त्‍यांचे आंदोलन सुरूच होते, मात्र अद्याप तरी कोणत्‍याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी बुलडाणा लाइव्हकडे व्‍यक्‍त केली.

उपोषणाला बसलेल्या सातही महिला भूमिहीन व दारिद्र्य रेषेखालील आहेत. पंतप्रधान आवास योजनेसाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत आम्हाला कधीच बोलावले नाही. उलट गावातील अन्य नोकरदार व जमीनदार व सधन लोकांची घरे सिमेंट काँक्रिटची असूनसुद्धा त्यांची नावे घरकुलाच्या यादीत आली आहेत, असा आरोप महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. घरकुल मिळेपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचे महिलांनी सांगितले. छाया जनार्धन थोरात, पुष्पा शत्रुघ्न निकस, कांताबाई परमेश्वर जाधव, कुशिवर्ता शालीग्राम ठोकले, शोभा उकंडा इंगळे, कमलाबाई प्रकाश खोकले, केसराबाई बाबुराव मापारी यांचा आंदोलनात सहभाग आहे.