देऊळगाव राजात सर्वपक्षीय नेत्‍यांनी घेतले राजीव सातव यांच्‍या अस्‍थिकलशाचे दर्शन

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा येथे सर्वपक्षीय नेत्यांनी खासदार राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात यांनी अस्थिकलश देऊळगाव राजा शहरातील बसस्थानकासमोरील अजिंठा गेस्ट हाऊसमध्ये ठेवला. कोरोनाविषयक नियम पाळून सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार शशिकांत खेडेकर, बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम खांडेभराड, …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा येथे सर्वपक्षीय नेत्‍यांनी खासदार राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेसच्‍या ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात यांनी अस्‍थिकलश देऊळगाव राजा शहरातील बसस्थानकासमोरील अजिंठा गेस्ट हाऊसमध्ये ठेवला.  कोरोनाविषयक नियम पाळून सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार शशिकांत खेडेकर, बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम खांडेभराड, माजी जिल्हा परिषद उपध्यक्ष गंगाधर जाधव, उपजिल्हा प्रमुख तथा शिवसेना नेते दीपक बोरकर, डॉ. सुनिल कायंदे, रमेश कायंदे, दिलीप झोटे, एकनाथ काकड, शेख इस्माईल शेख इब्राहिम, हनिफ शाह,अतिश कासारे, राजेश इंगळे, नवनाथ गोमधरे, अरविंद खांडेभराड, गजानन पवार, गणेश बुरुकूल आदी उपस्‍थित होते.