दिल्लीतील हिंसाचार : रविकांत तुपकर काय म्हणाले वाचा…

दिल्लीत हिंसाचार घडवणारे शेतकरी नव्हते; बाह्य शक्तींचा आंदोलनात शिरकाव, तुपकरांनी केली चौकशीची मागणीबुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसचे जे गालबोट लागले त्याचे कुणीही समर्थन करत नाही. या देशात तिरंग्यापेक्षा कुणीही मोठा नाही. या देशाचा तिरंगा हा आम्हा शेतकर्यांची आण-बाण-शान आहे. काल दिल्लीत जी हिंसा झाली ती कुणी घडवून …
 

दिल्लीत हिंसाचार घडवणारे शेतकरी नव्हते; बाह्य शक्तींचा आंदोलनात शिरकाव, तुपकरांनी केली चौकशीची मागणी
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसचे जे गालबोट लागले त्याचे कुणीही समर्थन करत नाही. या देशात तिरंग्यापेक्षा कुणीही मोठा नाही. या देशाचा तिरंगा हा आम्हा शेतकर्‍यांची आण-बाण-शान आहे. काल दिल्लीत जी हिंसा झाली ती कुणी घडवून आणली याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्यक्त केले.


दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन हे अतिशय शांततेत सुरू होते. मात्र एका रात्रीतून शेतकरी कायदा हातात घेतीलच कसा, असा प्रश्‍नही श्री. तुपकर यांनी उपस्थित केला. आंदोलनात बाहेरच्या शक्ती घुसल्याने हिंसा घडल्याचे ते म्हणाले. आंदोलनात कोणती माणसे घुसली आणि ही हिंसा कुणी घडवून आणली याची चौकशी होणे गरजेचे आहे. कालच्या हिंसेमुळे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने शेतकर्‍यांचा संबंध खलिस्तानशी, पाकिस्तानशी आणि चीनशी जोडला. शेतकरी दहशतवादी आणि नक्षलवादी ठरवले. हे सर्व प्रयत्न करूनही शेतकरी माघार घेत नाही म्हणून कालच्या हिंसेचे खापर शेतकर्‍यांवर फोडण्यात येत आहे. शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. अजूनही वेळ गेलेली नाही,केंद्र सरकारने त्वरित या आंदोलनाची दखल घ्यावी. जबरदस्ती लादण्यात आलेले कृषी कायदे मागे घ्यावेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा श्री. तुपकर यांनी दिला.