तहसीलदारांनी घेतला गुरुजींसह कर्मचार्‍यांचा 7 तास ‘वर्ग’!; ‘सहकार’मध्ये पार पडले ग्रामपंचायतचे मॅरेथॉन प्रशिक्षण

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या बुलडाणा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी होणार्या मतदानाचे आज, 2 जानेवारीला 1060 शिक्षक व विविध विभागांच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कमीअधिक 7 तास चाललेल्या या ट्रेनिंगमध्ये तहसीलदार रुपेश खंडारे यांनी गुरुजींसह अन्य कर्मचार्यांचे अधूनमधून वर्ग घेतले तर गुरुजींनी निवडणूक भत्त्यासह विविध विषयांवर तहसीलदारांची …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या बुलडाणा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी होणार्‍या मतदानाचे आज, 2 जानेवारीला 1060 शिक्षक व विविध विभागांच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले.

कमीअधिक 7 तास चाललेल्या या ट्रेनिंगमध्ये तहसीलदार रुपेश खंडारे यांनी गुरुजींसह अन्य कर्मचार्‍यांचे अधूनमधून वर्ग घेतले तर गुरुजींनी निवडणूक भत्त्यासह विविध विषयांवर तहसीलदारांची फिरकी घेतली. चिखली मार्गावरील सहकार विद्या मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात आज 2 जानेवारीला सकाळी 10.30 वाजता प्रशिक्षणास प्रारंभ झाला. यावेळी तहसीलदार रुपेश खंडारे, नायब तहसीलदार मंजुषा नेताम, अमरसिंह पवार, विद्या गौर, श्याम भामळे यांच्यासह मास्टर ट्रेनर तलाठी पी. बी. गवळी, हर्षाली हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदानासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1 व 2 यांना यावेळी मतदान नमुने भरणे, ईव्हीएम हाताळणी, सीएसआर, मॉक पोल, सिलिंग, साहित्य वाटप व तपासणी, मतदान प्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले.