…तर महिला रुग्णालयात राहणार सर्वोत्तम आरोग्य सुविधा! महिला- बालकांसाठी ठरणार वरदान!! सुसज्ज नियोजन

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः करोडो रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेले बुलडाणा येथील महिला रुग्णालय नजीकच्या काळात महिला व बालकांसाठी आरोग्य वरदान ठरू शकते. एवढेच नव्हे तर पश्चिम विदर्भातील उत्कृष्ट, अत्याधुनिक आरोग्य संस्था ठरू शकते. मात्र त्यासाठी एकच अट असून तिची पूर्तता करणे प्रशासनच काय शासनाच्याही हाती नसून, ती मानवतेचा मोठा शक्तिमान …
 
…तर महिला रुग्णालयात राहणार सर्वोत्तम आरोग्य सुविधा! महिला- बालकांसाठी ठरणार वरदान!! सुसज्ज नियोजन

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः करोडो रुपये खर्चून निर्माण करण्यात आलेले बुलडाणा येथील महिला रुग्णालय नजीकच्या काळात महिला व बालकांसाठी आरोग्य वरदान ठरू शकते. एवढेच नव्हे तर पश्चिम विदर्भातील उत्कृष्ट, अत्याधुनिक आरोग्य संस्था ठरू शकते. मात्र त्यासाठी एकच अट असून तिची पूर्तता करणे प्रशासनच काय शासनाच्याही हाती नसून, ती मानवतेचा मोठा शक्तिमान शत्रू असलेल्या कोरोना उर्फ कोविड च्या हाती आहे.

वाचून थक्क झालात ना? होय, हे सत्य आहे. कारण हे सुखद चित्र प्रत्यक्षात साकारण्यासाठीची अट आहे ती म्हणजे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट यायला (च) नको! अनेक वर्षांनंतर बुलडाण्यात साकारलेले वुमन्स हॉस्पिटल अर्थात महिला रुग्णालय महिला व बालकांसाठी वरदानच ठरणार होते. किंबहुना त्याची निर्मिती त्यासाठीच करण्यात आली. मात्र ते महिला रुग्णसेवेसाठी सज्ज होत नाही तोच कोरोनाने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे हा दवाखाना प्रत्यक्षात (दीर्घकाळ) कोविड रुग्णालय ठरला! आता कोरोनाचा जोर ओसरत असल्याने आता येथे सुसज्ज महिला रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका टळला तर फार तर एकदीड महिन्यात येथे केवळ आणि केवळ महिला रुग्णालय कार्यान्वित होणार आहे.

या ठिकाणी महिला व बालकांना सर्व आधुनिक आरोग्य सेवा मिळणार आहे. यासंदर्भात संपर्क साधला असता कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी याला दुजोरा दिला. सध्या ही संकल्पना प्राथमिक अवस्थेत असून, कोरोनाने नाट लावली नाही तर लवकरच येथे २२० बेड्‌सचे महिला रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वसेकर यांच्या मार्गदर्शनात याची जय्यत पूर्वतयारी करण्यात येत आहे. कोविड रुग्णालयाची जबाबदारी ताकदीने पेलणाऱ्या डॉ. वसेकरांच्या मार्गदर्शनात हे रुग्णालय पश्चिम वऱ्हाडातील उत्कृष्ट रुग्णलाय ठरेल, असा दावाही त्यांनी बोलून दाखविला. महिला रुग्णालयात सुसज्ज व्यवस्था, मूलभूत सुविधा व पुरेसा कर्मचारी वर्ग असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड हॉस्पिटल नजीकच्या टीबी रुग्णालयात कार्यन्वित होणार असून, तिथे १५० बेड्सची सुविधा राहणार असल्याचे डॉ. तडस यांनी स्पष्ट केले.