ठिय्याचा 5 दिवस… थंडीत कुडकुडत, तहानभूक विसरून न्‍यायहक्‍कासाठी वृद्ध कामगार ठाम!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुसरबीड येथील बंद पडलेल्या जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे वेतन थकीत आहे. ते देण्यात यावे यासाठी 15 फेब्रुवारीपासून कामगारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या दिला आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. थंडीत कुडकुडत, ना पिण्याचे पाणी, ना जेवण अशाही बिकट परिस्थितीत आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत खात्यात पैसे जमा …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुसरबीड येथील बंद पडलेल्या जिजामाता सहकारी साखर कारखान्‍याच्‍या कामगारांचे वेतन थकीत आहे. ते देण्यात यावे यासाठी 15 फेब्रुवारीपासून कामगारांनी जिल्‍हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या दिला आहे. आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. थंडीत कुडकुडत, ना पिण्याचे पाणी, ना जेवण अशाही बिकट परिस्‍थितीत आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, अशी भूमिका वृद्ध कामगारांनी घेतली आहे.


जिल्हा उपनिबंधकांना लोटपोट केल्या प्रकरणी यातील काही कामगारांवर बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. काल, 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. मात्र कोणताही निर्णय झाला नाही, असे कामगारांनी सांगितले. उतारवयातही प्रशासन पैसे उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचा रोष आंदोलकांत आहे. 27 जानेवारी रोजी सुद्धा त्‍यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्‍यावेळी 8 फेब्रुवारीपर्यंत पैसे मिळतील, असे लेखी जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र 8 फेब्रुवारीपर्यंतही पैसे न मिळाल्याने कामगारांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.