जूनचा लोकशाही दिन रद्द

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी शासनाने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत आदेश दिले आहेत. लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात येतो. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने जून महिन्याचा 7 जून रोजी होणारा लोकशाही दिन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी शासनाने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत आदेश दिले आहेत. लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात येतो. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने जून महिन्याचा 7 जून रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे, असे तहसीलदार (सामान्य प्रशासन) श्री. बंगाळे यांनी कळविले आहे.