जिल्ह्यातील 1500 वीज कर्मचारी संपावर; महावितरणचा कारभार वाऱ्यावर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी मिळून दीड हजारांवर कामगार, अभियंते संपावर गेल्याने महावितरणचा कारभार वाऱ्यावर आहे. आज, 24 मेपासून त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून, अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरूच राहणार आहे. या काळात केवळ अत्यावश्यक कामे हे कर्मचारी करणार असून, त्यामुळे नागरिकांची गैरसोय तेवढी टळणार आहे. फ्रंटलाइन वर्करचा दर्जा व …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी मिळून दीड हजारांवर कामगार, अभियंते संपावर गेल्याने महावितरणचा कारभार वाऱ्यावर आहे. आज, 24 मेपासून त्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून, अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरूच राहणार आहे. या काळात केवळ अत्‍यावश्यक कामे हे कर्मचारी करणार असून, त्‍यामुळे नागरिकांची गैरसोय तेवढी टळणार आहे.

फ्रंटलाइन वर्करचा दर्जा व इतर काही मागण्यांसाठी वीज कामगार, अभियंते, कंत्राटी व आऊट सोर्सिंग कामगार संघटनांच्‍या कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात आंदोलनाचे नेतृत्त्व विभागीय अध्यक्ष सुभाष सानप, सचिव संतोष दांदळे, सर्कल अध्यक्ष विजय चौरे यांच्‍यासह गजानन जायभाये, दादाराव डोंगरदिवे, प्रशांत पानझाडे, अजय झाल्‍टे, श्याम जाधव आदी करत आहेत. कृती समितीने आंदोलनाची नोटीस 16 मे रोजीच ऊर्जामंत्र्यांना दिली होती. त्‍या अनुषंगाने ऐन आंदोलनाच्‍या दिवशी कृती समितीसोबत ऊर्जामंत्र्यांनी ऑनलाइन बैठक घेतली. मात्र बैठकीतून काहीही निर्णय झाला नाही. त्‍यामुळे शासनाचा निषेध करत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेण्यात आली आहे.