जिल्हाधिकाऱ्यांना तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर; ‘एडेड’ च्या माजी विद्यार्थ्यांचे सामाजिक योगदान, अवघ्या 4 दिवसांत निधी संकलन

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तब्बल 94 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या येथील एडेड हायस्कूलच्या देशासह जगभरात विखुरलेल्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासनास 3 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देऊन सामाजिक बांधिलकी व बुलडाण्याबद्दलचे ऋणानुबंध किती घट्ट आहे हे दाखवून दिले. शालेय जीवनात मिळालेले संस्कार व सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा या विद्यार्थ्यांनी जपला आहे. जगभर …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तब्बल 94 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या येथील एडेड हायस्‍कूलच्या देशासह जगभरात विखुरलेल्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासनास 3 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देऊन सामाजिक बांधिलकी व बुलडाण्याबद्दलचे ऋणानुबंध किती घट्ट आहे हे दाखवून दिले.

शालेय जीवनात मिळालेले संस्कार व सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा या विद्यार्थ्यांनी जपला आहे. जगभर कुठेही असले तरीही बुलडाणा शहराशी जुळलेले ॠणानुबंध जपत कोविडच्या काळात आपण बुलडाणेकर असल्याची जाणीव या विद्यार्थ्यांनी जपत इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. बुलडाण्यातील कोविड रुग्णांना मदत होईल असं काहीतरी आपण करावं असा विचार एडेडच्या माजी विद्यार्थी समूहात चर्चेला आला. विचाराअंती प्राणवायूचा तुटवडा बघता ऑक्सीजन कॉन्सट्रेटर देण्याचा विचार पुढे आला. मग फक्त व्हॉट्‌स ॲप समूहातील माजी एडेडीयन्सनी लागणारा निधी अवघ्या चार दिवसात संकलित केला.

फक्त व्हॉट्‌स ॲपवर केलेल्या एका छोट्याशा आवाहनाला प्रतिसाद देत एडेडच्या माजी विद्यार्थी समूहाने तीन ऑक्सीजन कॉन्सट्रेटर विकत घेतले. ते जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्‍याकडे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे व सदस्यांनी सुपूर्द केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी अप्पर जिल्‍हाधिकारी धनंजय गोगटे, एसडीओ राजेश्वर हांडे यांच्‍यासह संघटनेचे  अध्यक्ष  श्रीकांत देशपांडे, उन्मेष जोशी, मनोज बुरड, आनंद संचेती, अशोक शर्मा, आशिष शर्मा, विनोद राठी, राजेंद्र महाजन उपस्थित होते.