जाता जाता कोरोनाचा ‘शारा’ला दणका; 10 रुग्‍ण आढळल्याने गावासोबतही यंत्रणाही चिंतित, जिल्ह्यात 6 बळी; 151 पॉझिटिव्‍ह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जाता जाता कोरोनाने शारा (ता. लोणार) गावाला आज, 3 जून रोजी दणका दिल्याचे समोर आले आहे. या गावात तब्बल 10 रुग्ण आढळल्याने गावकऱ्यांसोबत यंत्रणाही चिंतित झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात 151 नवे बाधित रुग्ण समोर आले असून, 6 बळी गेले आहेत. यात उपचारादरम्यान लाखनवाडा (ता. खामगाव) येथील 68 वर्षीय महिला, कोल्ही …
 
जाता जाता कोरोनाचा ‘शारा’ला दणका; 10 रुग्‍ण आढळल्याने गावासोबतही यंत्रणाही चिंतित, जिल्ह्यात 6 बळी; 151 पॉझिटिव्‍ह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जाता जाता कोरोनाने शारा (ता. लोणार) गावाला आज, 3 जून रोजी दणका दिल्याचे समोर आले आहे. या गावात तब्‍बल 10 रुग्‍ण आढळल्‍याने गावकऱ्यांसोबत यंत्रणाही चिंतित झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात 151 नवे बाधित रुग्‍ण समोर आले असून, 6 बळी गेले आहेत. यात उपचारादरम्यान लाखनवाडा (ता. खामगाव) येथील 68 वर्षीय महिला, कोल्ही गवळी (ता. मोताळा) येथील 62 वर्षीय महिला, आडविहीर (ता. मोताळा) येथील 65 वर्षीय पुरुष, हतेडी (ता. बुलडाणा) येथील 70 वर्षीय पुरुष, उबाळखेड (ता. तेल्हारा जि. अकोला) येथील 62 वर्षीय पुरुष, गनुवाडी (जि. अमरावती) येथील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4092 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3941 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 151 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 98 व रॅपीड टेस्टमधील 53 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 493 तर रॅपिड टेस्टमधील 3448 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 19, बुलडाणा तालुका : साखळी खुर्द 1, येळगाव 1, पांगरी 1, दहीद बुद्रूक 1, रायपूर 1, चांडोळ 2, पाडळी 2, जामठी 1, चौथा 1, जांभरून 3, सागवन 1, कोलवड 1, मासरूळ 1, धाड 2, मोताळा तालुका : परडा 2, कोथळी 1, खडकी 2, सिंदखेड 1, कोल्ही गवळी 1, खामगाव शहर : 6, खामगाव तालुका : राहुड 1, बोरी 1, किन्ही महादेव 1, बोरजवळा 1, लाखनवाडा 1, चिखली शहर :1, चिखली तालुका : केळवद 1, भोरसा भोरसी 1, कोलारी 1, सावरखेड 1, देऊळगाव राजा शहर : 8, देऊळगाव राजा तालुका : बोराखेडी 1, पांगरी 1, कुंभारी 1, उंबरखेड 1, सिनगाव जहाँगीर 2, खल्याळ गव्हाण 1, मंडपगाव 1, डोढ्रा 3, गारखेड 2, देऊळगाव मही 2, सातेफळ 1, जांभोरा 2, पळसखेड 1, सिंदखेड राजा शहर : 3, सिंदखेड राजा तालुका : आडगाव राजा 1, पिंपळगाव लेंडी 2, शेलगाव 1, पिंपरखेड 1, साठेगाव 1, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : उटी 1, बालखेड 1, बोरी 1, बऱ्हाई 2, डोणगाव 1, सावंगी वीर 1, मातला 1, कारंजा 1, पेनटाकळी 2, भोसा 1, जळगाव जामोद शहर : 1, नांदुरा शहर : 2, नांदुरा तालुका : घाणेगाव 3, पिंपळखुटा धांडे 1, भोटा 1, तांदुळवाडी 2, लोणार शहर : लोणार तालुका : देऊळगाव कोळ 1, शिंदी 1, डोंगरगाव 2, वेणी 1, किन्ही 1, सोनोशी 1, चिखला 1, शारा 10, कसारी 2, सोमठाणा 1, परजिल्हा उबाळखेड ता. तेल्हारा 1, अकोला 1, वाकद ता. रिसोड 1, जालना 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 151 रुग्ण आढळले आहेत.

299 रुग्णांचा डिस्‍चार्ज
आज 299 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 492659 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 83295 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1096 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85232 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 1315 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 622 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.