चिखलीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहिना 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट पोलीस अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप झाल्याने महाराष्ट्राचे नाव बदनाम झाले. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या चिखली तालुका व शहर शाखेतर्फे आज, 21 मार्चला आंदोलन करण्यात आले आहे. चिखली येथील छत्रपती …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहिना 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट पोलीस अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप झाल्याने महाराष्ट्राचे नाव बदनाम झाले. त्‍यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्‍या चिखली तालुका व शहर शाखेतर्फे आज, 21 मार्चला आंदोलन करण्यात आले आहे. 

चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आंदोलन झाले. आंदोलनात पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त, डॉ. प्रतापसिंह राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, कुणाल बोंद्रे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुदर्शन खरात, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, पंजाबराव धनवे, दिलीप डागा, प्रा. वीरेंद्र वानखेडे, सुरेंद्र पांडे, रघुनाथ कुलकर्णी, सचिन कोकाटे, महेश लोणकर, नगरसेवक सुभाष अप्पा झगडे, किशोर जमादार, भारत दानवे, विजय खरे,चेतन देशमुख, हरिभाऊ परिहार, अक्षय भालेराव, सिद्धेश्वर ठेंग, बळीराम काळे, संदीप लोखंडे, राजू अंभोरे, नितीन गोराडे, सागर पुरोहित, शंकर रुद्रकर, दत्ता खंडेलवाल, दीपक भाकडे यांच्‍यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.