चिखलीतील खंडाळा रोडवर मोठमोठे खड्डे!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या अनेक दिवसांपासून खंडाळा रोडवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो व पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. विशेष म्हणजे खंडाळा रोडवरील श्रीराम नागरी बँकेच्या चौकामध्ये भाजीपाला विक्रीसाठी गोरगरीब भाजीविक्रेते बसलेले असतात. त्याठिकाणी खड्ड्यांमधून गाडी गेली असता त्यामधील पाणी त्या …
 
चिखलीतील खंडाळा रोडवर मोठमोठे खड्डे!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या अनेक दिवसांपासून खंडाळा रोडवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो व पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. विशेष म्हणजे खंडाळा रोडवरील श्रीराम नागरी बँकेच्या चौकामध्ये भाजीपाला विक्रीसाठी गोरगरीब भाजीविक्रेते बसलेले असतात. त्याठिकाणी खड्ड्यांमधून गाडी गेली असता त्‍यामधील पाणी त्या विक्रेत्यांच्या अंगावर व भाजीपाल्यावर सुद्धा उडत असते. नगरपालिका व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या धोकादायक परिस्थितीकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे, यासाठी डॉ. अमोल लहाने, छोटू अवसरमोल, भाजीपाला विक्रेत्‍यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. ही बाब नगराध्यक्षा सौ. प्रियाताई बोंद्रे व कुणाल बोंद्रे यांची भेट घेऊन सांगितली. यावर नगराध्यक्षा व कुणाल बोंद्रे यांनी रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवू, असे आश्वासन दिले. यावेळी राहुल गवई, प्रभाकर नागरे, अक्षय मघाडे, अभिजित कऱ्हाडे, आदित्य झाल्टे, स्वप्नील साळवे, अजय जाधव, अनिल असोलकर, राजू घेवंदे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.