चाचण्या कमी; रुग्ण कमी! आज 983 पॉझिटिव्ह; पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात कोरोनाचे थैमान!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विकेंडला नमुने संकलन व जोडीला कमी अहवाल आल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत तुलनेने घट आलीय! सलग 3 दिवस हजारावर रुग्ण आल्यावर आज, 26 एप्रिलला 983 इतके रुग्ण आले. मात्र पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील कोविडचे थैमान जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात जवळपास आठवड्यापासून तीन …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विकेंडला नमुने संकलन व जोडीला कमी अहवाल आल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांच्या संख्येत तुलनेने घट आलीय! सलग 3 दिवस हजारावर रुग्ण आल्यावर आज, 26 एप्रिलला 983 इतके रुग्ण आले. मात्र पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील कोविडचे थैमान जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.

सिंदखेडराजा  तालुक्यात जवळपास आठवड्यापासून तीन आकड्यांत कोरोना पेशंट निघाताहेत. आज तालुक्यात 96 रुग्ण निघाले. देऊळगाव राजा तालुक्याने आज रेकॉर्डब्रेक 171 पॉझिटिव्हचा भीषण आकडा गाठलाय! मात्र बुलडाणा तालुका 177 सह खिलाडी नंबर वन आहे. यापाठोपाठ बुलडाणा तालुक्याची  पाठ व साथ न सोडणाऱ्या खामगाव तालुक्यात 112 रुग्णांची नोंद झाली, हे तालुके आघाडीवर आहे म्हणून बाकी तालुके मागे आहेत, कमी पडताहेत असे अजिबात नाय! शेगाव 80, चिखली 74, मलकापूर 67, नांदुरा 85, लोणार 67 हे आकडेच याचे पुरावे आहेत. या तुलनेत मेहकर 10, मोताळा 1, जळगाव जामोद 24 आणि संग्रामपूर 19 अशी रुग्ण संख्या आहे.

3 तासांत एकाचा मृत्यू

3769 चाचणी अहवाल मिळाले असतानाही 983 पॉझिटिव्ह निघणे हा दिलासा मानावा काय हा एक मजेदार प्रश्न आहे. मात्र गत्‌ 24 तासांत 8 रुग्णांचे मृत्यू ही गंभीर बाब ठरावी. म्हणजे सरासरी 3 तासात 1 पेशंट दगवलाय! ही गती व सरासरी सर्वसामान्यांच्या उरात धडकी भरविणारी आहे.