घरासमोर खेळणार्‍या चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला!; कुत्रे-डुकरांचा मोर्चा आता कोंबड्या, बकर्‍यांकडून चिमुकल्यांकडे!

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजवर कोंबड्या, बकर्यांची पिल्ले लक्ष्य केल्यानंतर मोकाट कुत्रे, डुकरांनी चिमुकल्यांकडे आपला मोर्चा वळवला असून, यामुळे नागरिकांत दशहत निर्माण झली आहे. विशेष करून जमजम कॉलनी आणि नवी नगरी भागात हे प्रकार वाढले आहेत. जमियत उलमाए हिंद शाखा लोणारचे सेक्रेटरी मोहम्मद रिजवान मोहम्मद नासेर (जड्डा) यांच्या चार वर्षीय चिमुकलीवर …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजवर कोंबड्या, बकर्‍यांची पिल्ले लक्ष्य केल्यानंतर मोकाट कुत्रे, डुकरांनी चिमुकल्यांकडे आपला मोर्चा वळवला असून, यामुळे नागरिकांत दशहत निर्माण झली आहे. विशेष करून जमजम कॉलनी आणि नवी नगरी भागात हे प्रकार वाढले आहेत. जमियत उलमाए हिंद शाखा लोणारचे सेक्रेटरी मोहम्मद रिजवान मोहम्मद नासेर (जड्डा) यांच्या चार वर्षीय चिमुकलीवर नुकताच एका मोकाट कुत्र्याने हल्ला चढवत तिला चावे घेतले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन या प्रश्‍नी तातडीने हालचाली करण्याची मागणी केली आहे.

मोकाट कुत्रे-डुकरे लहान मुलांच्या अंगावर धावून येतात. कोंबड्या व बकर्‍यांच्या पिल्लांना घरात घुसून घेऊन जात आहेत. यामुळे रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यात गरीब लोकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रारही निवेदनात रिजवान मोहम्मद नासेर यांनी केली आहे. कुत्रे-डुकरांना पकडून शहराच्या बाहेर सोडावे अन्यथा नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे. ताबडतोब कारवाई करावी. अन्यथा एखाद्या दिवशी हे मोकाट कुत्रे- डुक्कर घरात घुसून लहान मुलांना प्राणहानी पोहोचू शकताात. असे घडले तर याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाची राहील. – मोहम्मद रिजवान (जड्डा), सेक्रेटरी जमियत उलमाए हिंद शाखा लोणार