गोर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कृषी कायदा मागे घेण्यासाठी दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पूर्ण समर्थन म्हणून गोर सेनेतर्फे 21 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.25 जानेवारीपर्यंत आंदोलन चालणार आहे. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. उपोषणात गोर सेना शहराध्यक्ष रमेश पवार, विलास चव्हाण, स्वप्नील चव्हाण, आकाश राठोड, विशाल …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कृषी कायदा मागे घेण्यासाठी दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पूर्ण समर्थन म्हणून गोर सेनेतर्फे 21 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
25 जानेवारीपर्यंत आंदोलन चालणार आहे. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. उपोषणात गोर सेना शहराध्यक्ष रमेश पवार, विलास चव्हाण, स्वप्नील चव्हाण, आकाश राठोड, विशाल जाधव, अजय चव्हाण, विशाल राठोड, अजय चव्हाण, विशाल चव्हाण, ओम राठोड, अक्षय राठोड, मयुर राठोड, पवन राठोड, लक्ष्मण पवार, मुकेश चव्हाण, सुभाष मिसाळ, सोपान चव्हाण, सुरेश राठोड, गजानन राठोड, संदीप पवार आदी सहभागी झाले आहेत.