साडेअकरापर्यंत अडीच लाखांवर मतदारांच्या तर्जनीला लागली शाई!; मतदानाने घेतली गती

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सकाळी धीम्या गतीने सुरू झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाने दुसर्या टप्प्यात गती घेतल्याचे दिसून आले. सकाळी 7ः30 ते 11ः30 वाजेदरम्यान जिल्ह्यात सरासरी 26.54 टक्के मतदानाची नोंद झाली. या कालावधीत 2 लाख 57 हजार 660 मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला मतदान दर्शक शाई लागली! राची कामे आटोपून महिला मतदार बाहेर …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सकाळी धीम्या गतीने सुरू झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाने दुसर्‍या टप्प्यात गती घेतल्याचे दिसून आले. सकाळी 7ः30 ते 11ः30 वाजेदरम्यान जिल्ह्यात सरासरी 26.54 टक्के मतदानाची नोंद झाली. या कालावधीत 2 लाख 57 हजार 660 मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला मतदान दर्शक शाई लागली!

राची कामे आटोपून महिला मतदार बाहेर पडल्याने मतदानाचा आकडा 1 लाख 22 हजार 43 (25.30 टक्के) पर्यंत गेला. या तुलनेत बाप्यांची टक्केवारी 27.78 इतकी होती. 1 लाख 35 हजार 617 पुरुषांनी मतदान केले. संग्रामपूरने मुसंडी मारीत 36 टक्क्यांच्या घरात मजल मारली. चिखली, देऊळगाव राजाची टक्केवारी 30 टक्केच्या पल्याड गेली.